Saturday, April 26, 2025
Homeनगरकळसुबाई शिखरावर चढाई करताना पर्यटकाचा मृत्यू

कळसुबाई शिखरावर चढाई करताना पर्यटकाचा मृत्यू

भंडारदरा |प्रतिनिधी| Bhandardara

कळसुबाई शिखरावर (Kalsubai Peak) चढाई करताना एका तरूण पर्यटकाचा मृत्यू (Youth Tourists Death) झाल्याची घटना घडली आहे. नवमीन नरेशभाई पटेल (वय 25) राहणार गुजरात असे मृत झालेल्य तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी रविवारी सकाळी साडेसात वाजता नवमीनने त्याच्या मित्रांसोबत कळसुबाई शिखरावर (Kalsubai Peak) चढायला सुरुवात केली.

- Advertisement -

सुमारे अडीच तास शिखराची चढाई केल्यानंतर नवमीन यास धाप लागली व तो चक्कर येऊन जागेवर कोसळला. त्यामुळे त्याच्या मित्रांनी व उपस्थित पर्यटकांनी त्याला तात्काळ खाली घेऊन येण्याचा प्रयत्न केला. यावेळी 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी वमीन पटेल यास मयत घोषित केले नवमीन हा गुजरातमधील (Gujarat) वलसाड येथील रहिवासी असून तो एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. राजूर पोलीस स्टेशनमध्ये (Rajur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...