Monday, June 17, 2024
Homeनाशिक...अन् कळवण झाले 'सुजलाम सुफलाम'; पाहा व्हिडीओ

…अन् कळवण झाले ‘सुजलाम सुफलाम’; पाहा व्हिडीओ

नाशिक | Nashik

- Advertisement -

शहरापासून सुमारे ९० किलोमीटरवर कळवण (Kalwan) हे शहर असून याठिकाणी ग्रामीण भागातील नागरिकांची नेहमी ये-जा असते. कळवण शहराला नगरपरिषदेचा दर्जा (Status of Municipal Council) मिळाल्यापासून याठिकाणी मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या परिसरात प्रामुख्याने कांदा, ऊस, मका, ही पिके घेतली जातात…

येथील नगरपरिषदेच्या सध्याच्या सुरु असलेल्या कामकाजाबाबत माहिती देतांना नगराध्यक्ष कौतिक पगार (Mayor Kautik Pagar) यांनी सांगितले की, कळवण शहराचा विकास हा येथील स्थानिक आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांच्या सहकार्याने जोरात सुरु असून आमदार निधीतून चणकापूर धरणामधून (Chankapur Dam) साडे पंचवीस कोटींची पाणी पुरवठा योजना (Water Supply Scheme) मंजूर केली आहे.

तसेच शहरात आश्रमशाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे (Education) जाळे पसरविले जात असून स्थानिक आमदारांच्या मदतीने रोजगार आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय शहरात पाण्याच्या टाकीबरोबरच चणकापूर धरणातून पाईपलाईनचे काम सुरु आहे. तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविल्या जात असल्याचे पगार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या