Saturday, July 27, 2024
Homeनाशिककळवणच्या कन्येची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; 'या' चित्रपटात साकारली मुख्य भूमिका

कळवणच्या कन्येची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; ‘या’ चित्रपटात साकारली मुख्य भूमिका

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यात सध्या मनोरंजांच्या क्षेत्रात चर्चा सुरु आहे ती ‘रौंदळ’ (Raundal) या मराठी चित्रपटाची, त्याचे कारण आहे कळवण तालुक्यातील एका नवोदित अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर केलेला दमदार प्रवेश…

- Advertisement -

‘रौंदळ’ हा मराठी चित्रपट आज दि. ०३ मार्च पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आनंदाची बाब म्हणजे या चित्रपटातील अभिनेत्री ही नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या कळवण तालुक्यातील जुनी बेज या गावातील आहे.

त्यामुळे जिल्ह्यात तिच्या या यशाचे कौतुक होत आहे. बेज सारख्या अतिशय ग्रामीण भागातील, सामान्य शेतकरी कुटुंबातील एका मुलीने एखाद्या चित्रपटात झळकावं ही त्या गावासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल (Adivasi) म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील नेहा शशिकांत सोनवणे (Neha Sonawane) हिने आपले नाव मराठी सिनेसृष्टीत चमकवले आहे, त्यामुळे कळवण सह जिल्ह्यात नेहाच्या कामाची जोरदार चर्चा होत आहे.

मोठी बातमी! बारावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

‘रौंदळ’ (Raundal movie ) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी नेहा सोनावणे ही मूळची कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील राहणारी आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ (Khwada) आणि ‘बबन’ या रोमँटिक चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) आणि मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी नेहा सोनवणे ‘रौंदळ’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत.

२३ तारखेला ‘त्या’ लॉन्ग मार्चची पुनरावृत्ती; सरकारविरोधात माकप, किसान सभा आक्रमक

नेहा ही जुनी बेज (juni Bej) येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असून तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण कळवण शहरात झाले आहे. तिने कॉम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केली असून ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. नेहाला चित्रपटसृष्टीचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता. महाविद्यालयात शिक्षण घेता घेता कुठलाही अनुभव नसताना जिद्द, चिकाटी आणि अस्सल शेतकरी असल्याने शेतीच्या कामातील ज्ञानाने-अनुभवाने तिला रौंदळ या चित्रपटातील भूमिका मिळाली.

नेहाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने प्रचंड मेहनत नेहाने आणि सर्वच टीमने घेतल्याचे दिसून येते. रौंदळ चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर, बारामती, नारायणगाव, पुणे या ठिकाणी करण्यात आले असून शुटिंग दरम्यान शेतीकामे, ऊसतोड, मोळी उचलण्याचा आदी अनुभव घेतल्याचे नेहाने सांगितले. तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या चित्रपटात शेतकऱ्याची मुलगी म्हणून अभिनय करताना प्रचंड समाधान वाटल्याचे सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शेतीची माहिती, शेतीकामाची अंशत: सवयीमुळे मला चित्रपटात काम मिळाले. याशिवाय झाडावर चढणे सुद्धा ऑडिशनप्रसंगी (audition) काम मिळण्यासाठी महत्वाचे ठरले. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींनी शिक्षणासोबत शेतीतील अनुभव घ्यावा. शेतकरी कुटुंबातील मुली कुठल्याही क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू शकतात, यावर विश्वास ठेवावा, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री नेहा सोनवणे हिने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या