Friday, May 3, 2024
Homeनगरकल्याण रोड परिसरातील भूखंडाचे होणार सुशोभीकरण

कल्याण रोड परिसरातील भूखंडाचे होणार सुशोभीकरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कल्याण रोड परिसरातील समतानगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ महापालिकेचा दोन एकराचा ओपन पेसचा भूखंड असून या भूखंडाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.

- Advertisement -

कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी भोसले यांची भेट घेऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांच्या मागणीनुसार भोसले यांनी गुरूवारी पाहणी केली आहे. लवकरच या भूखंडाच्या सुशोभीकरणासाठी याठिकाणी लाल मातीचा जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवणार व मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून संवर्धन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी पुढे येऊन मनपाच्या मोकळ्या जागेवर झाडे लावावे. दिवसेंदिवस कल्याण रोड परिसर हा झपाट्याने विकसित होणारा भाग आहे. लवकरच या सुशोभीकरणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही भोसले यांनी दिली.

यावेळी माजी प्राचार्य खासेराव शितोळे, दत्ता गाडळकर, भगवान काटे, आबासाहेब कर्डिले, भाऊसाहेब थोटे, भगवंतराव शेंडगे, बळवंतराव नागवडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या