Wednesday, February 4, 2026
HomeनगरNewasa : कामिका एकादशीनिमित्त नेवाशात पैस खांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

Newasa : कामिका एकादशीनिमित्त नेवाशात पैस खांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

श्री ज्ञानेश्वर माऊलींची (Shri Dnyaneshwar Mauli) कर्मभूमी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान तीर्थक्षेत्र नेवासा (Newasa) येथे कामिका एकादशी यात्रेनिमित्त (Kamika Ekadashi Yatra) माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे (Pais Khamb) दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात मंदिराचे प्रमुख देविदास महाराज म्हस्के, नंदकिशोर महाराज खरात, ज्ञानेश्वर शिंदे, कृष्णा पिसोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत एकनाथ महाराज यांचे वंशज डॉ. मेघशाम महाराज गोसावी, ज्ञानराज महाराज गोसावी, राजवर्धन महाराज, देवस्थान विश्वस्त कैलास जाधव, प्रतिभा जाधव यांच्या हस्ते पैस खांबास अभिषेक करण्यात आला.

- Advertisement -

मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारीसह मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.एक किलोमीटर अंतरावर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर मंदिर प्रांगणात माजी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळासह पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने उद्योजक प्रभाकरराव शिंदे, संचालक बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी शाबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

YouTube video player

मंदिर वाटेवर तलवार परीवार, लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्था तसेच संत नरहरी महाराज मंदिरातही खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. स्वप्नील मगर व परिवाराच्या वतीने थंडगार पाण्याचे वाटप करण्यात आले.नेवासाफाटा रस्त्यावर नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले. श्री मोहिनीराज मंदिराच्या समोर श्री मोहिनीराज भक्त मंडळाच्या वतीने उकडलेले शेंगदाणे व चहाचे वाटप करण्यात आले. एकादशीच्या निमित्ताने देवगड (Devgad) दत्त मंदिर संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विश्वासराव गडाख यांनी पैस खांबाचे दर्शन घेतले.

भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्यावतीने तहसीलदार संजय बिरादार तर पोलीस दलाच्यावतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होमगार्ड जवानांसह महिला होमगार्ड व स्वयंसेवकांनी देखील सेवा दिली. जिल्हा परिषद शाळा प्रांगण, ज्ञानोदय हायस्कूल प्रांगण, नेवासा बुद्रुक येथील नाथबाबा विद्यालय, नेवासा मार्केट कमिटी प्रांगण या मुख्य ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिराचे जीर्णोद्धारक वै. बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती.

तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव या भागातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी येथे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत हजेरी लावली. दिंड्यांतील वारकर्‍यांचे देविदास महाराज म्हस्के, देवस्थान अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळाने स्वागत केले.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...