Saturday, May 4, 2024
Homeजळगावकामिनी धांडे यांची तीन दिवसात 360 किमी.ची पंढरपूर सायकलवारी

कामिनी धांडे यांची तीन दिवसात 360 किमी.ची पंढरपूर सायकलवारी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

रॉयल रायडर्स नाशिक (Royal Riders Nashik) यांच्यातर्फे नाशिक ते पंढरपूर (Nashik to Pandharpur) 360 किमी.ची सायकलवारी (Cycling) आयोजित केली होती. 155 वारकर्‍यांनी एक तीर एक कमान, सब रायडर्स एक समान याची अनुभूती घेत सायकलवारी यशस्वीरित्या पूर्ण केली. या वारीत जळगाव सायकलिस्ट (Jalgaon Cyclist) च्या सदस्य कामिनी धांडे (Kamini Dhande) यांनीही सहभाग घेऊन ऊन, वारा व पाऊस याला न जुमानता आनंदमय, भक्तिमय वातावरणात उत्साहात सायकलवारी पूर्ण केली. कामिनी धांडे या पंढरपुरवारी सायकलवर पूर्ण (Complete on Pandharpurwari cycle) करणार्‍या जळगावातील पहिली महिला ठरल्या आहेत.

- Advertisement -

आषाढी एकादशी निमित्त रॉयल रायडर्स नाशिक यांच्यातर्फे नाशिक ते पंढरपूर सायकलवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या दिवशी नाशिक ते अहमदनगर 157 किमी, दुसर्‍या दिवशी अहमदनगर ते टेंभुर्णी 155 किमी व तिसर्‍या दिवशी टेंभुर्णी ते पंढरपूर 50 किमी सायकलिंग करून वारी पूर्ण केली आणि विठूूरायाचे दर्शन घेतले.

वारी यशस्वी होण्यासाठी वारी प्रमुख दत्तूमामा टिळे, संजय थोरात , विशाल शेळके, समन्वयक डॉ. आबा पाटील, सहकारी भूषण राणे, राजा कोटमे, गणेश कळमकर व सर्व सहकारी रायडर्स यांचे सहकार्य लाभले.

जळगाव जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रवास सूखकर झाल्याची भावना सायकलिस्ट कामिनी धांडे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या