Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनकंगनाचे संजय राऊतांवर टीकास्त्र, म्हणाली..

कंगनाचे संजय राऊतांवर टीकास्त्र, म्हणाली..

मुंबई | Mumbai

कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयावर महापालिकेनं कारवाई केल्यावर कंगणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका करणाऱ्या कंगानाने पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली होती. त्यानंतर, आज दसऱ्याच्या मुहूर्तावर तिच्या ऑफिसचा फोटो पुन्हा शेअर करत पुन्हा ठाकरे सरकारला डिवचलं आहे. “संजय राऊत माझं तुटलेलं स्वप्न तुमच्याकडे पाहून हसतंय. पप्पू सेना माझं घर तोडू शकतात मला नाही. बंगला क्रमाक ५ न आज वाईटावर विजय मिळवला आहे,” असं खोचक ट्विट कंगनानं केल आहे.

देशातील आरक्षण प्रकरणात कंगना रणौतची उडी

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी तिने आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “आरक्षण हे जातीनिहाय न देता आर्थिक निकषांवर देण्यात यावं. मला माहिती आहे की रजपूतांना प्रचंड त्रास होतोय. पण ब्राम्हणांना पाहूनही मला दु:ख होतं.” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ मार्च २०२५ – सामर्थ्याचे बळ

0
निश्चयाचे बळ अंगी असेल तर अशा व्यक्तीचा स्वतःकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाला चमत्कार वाटू शकेल अशी कामे अशी व्यक्ती करू शकते. ‘निश्चयाचे...