मुंबई | Mumbai
आपण मुंबईत येणार असून रोखून दाखवण्याचं आव्हान दिल्यानंतर कंगना आज दुपारी मुंबईत दाखल झाली. कंगना मुंबईत येणार असल्याने विमानतळाबाहेर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला पहायला मिळाला. कंगना घरी पोहचल्यावर एक करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे.
कंगनाने म्हंटले आहे की, “उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझं घर तोडलं आणि मोठा बदला घेतलाय. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. वेळेचं चक्र आहे, कोणासाठीही नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत असंच मी समजेन. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं याची जाणीव मला आज झाली. मी या देशाला वचन देतेय की, मी केवळ अयोध्या नाही तर काश्मीरवरही सिनेमा बनवेन. आपल्या देशातील नागरिकांना जागरुक करणार. ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे, कारण याला देखील एक अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र.”
दरम्यान आज सकाळी कंगनाच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या कार्यालयामधील तळमजल्यावर पालिकेचे कर्मचारी पोहचले. त्यांनी तिच्या कार्यालय तोडणे सुरु केले. याठिकाणी बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. बेकायदेशील बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला २४ तास उलटल्यावनंतर पालिकेकडून कारवाई सुरु झाली.