मुंबई | Mumbai
शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी कंगणाला मुंबईत येऊन दाखवण्याचं आव्हान दिले होते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगना मुंबईत आल्यास शिवसेनेच्या रणरागिनी तिचं थोबाड फोडतील असा इशारा दिला होता. मात्र मी मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान देणारी कंगणा रनौत आज मुंबई विमानतळावर दाखल झाली आहे.
मुंबई आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगणा राणावतच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तणावपूर्ण स्थिती होती. मुंबई विमानतळावर एकीकडे रिपाइं कार्यकर्ते कंगणाच्या समर्थनार्थ घोषणा देत असून शिवसैनिक विरोधात आंदोलन करत आहेत. यामुळे विमानतळावर तणाव निर्माण झाला आहे. कंगणा येणार असल्याने मुंबई विमानतळावर चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
एकीकडे करणी सेनेचे लोक कंगनाचं समर्थन करत आहेत तर जवळपास १०० हून अधिक शिवसैनिक विमानतळावर तिच्या विरोधासाठी उभे राहिले आहेत. ‘निघून जा.. निघून जा.. कंगना रणौत निघून जा..’ असे नारेही शिवसैनिक देत आहेत. रामदास आठवले यांच्या पक्षातील काही लोकांनी सांगितलं की ते कंगनाला सुरक्षा देण्यासाठी आले आहेत.