Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजनकंगनाचं जया बच्चन यांना सडेतोड उत्तर, म्हणाली...

कंगनाचं जया बच्चन यांना सडेतोड उत्तर, म्हणाली…

नवी दिल्ली –

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी आज राज्यसभेत बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचा आरोप करत

- Advertisement -

संताप व्यक्त केला. या प्रकरणावर आता अभिनेत्री कंगना राणावत हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘जयाजी, माझ्या जागी जर तुमची मुलगी श्वेता असती आणि तिला किशोरवयात कोणी मारहाण केली असती, ड्रग्स दिले असते, तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती, तरीदेखील तुम्ही हेच म्हणाला असतात का? तसंच अभिषेक सातत्याने छळ आणि गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असता आणि एक दिवस लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तरी तुम्ही हेच बोलला असतात का?फ, असं ट्विट करत कंगनाने जया बच्चन यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर आमच्यावरही काही दया दाखवा’, असंही तिने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोक बदनाम करत असल्याचं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं होतं. मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा, असं त्या म्हणाल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द; कारणही...

0
नाशिक | Nashik जिल्ह्यातील मालेगावात (Malegaon) २००८ साली बॉम्ब स्फोट झाला होता. या बॉम्ब स्फोटात (Bomb Blast) आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh...