Wednesday, April 2, 2025
Homeमनोरंजन‘एक रोमँटिक सीन मिळायचा तोदेखील हिरोसोबत झोपल्यानंतर’

‘एक रोमँटिक सीन मिळायचा तोदेखील हिरोसोबत झोपल्यानंतर’

मुंबई | Mumbai –

अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांकडून होणार्‍या ड्रग्ज सेवनाचा मुद्दा उपस्थित करत त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. यावर राज्यसभेत मंगळवारी जया बच्चन यांनी

- Advertisement -

आक्षेप घेत ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात, अशा शब्दांत टीका केली होती. कंगनाने जया बच्चन यांच्या या टीकेला उत्तर देणारं ट्विट केलं असून जया बच्चन आणि इंडस्ट्रीने मला कोणतीही थाळी दिली नसल्याचं म्हटलं असून हिरोसोबत झोपल्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांची भूमिका मिळते असा आरोप केला आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणती थाळी दिली आहे. एक थाळी मिळाली होती ज्यामध्ये दोन मिनिटांचे आयटम नंबर्स आणि एक रोमँटिक सीन मिळायचा तोदेखील हिरोसोबत झोपल्यानंतर…मी इंडस्ट्रीला स्त्रीवादाचा धडा दिला. थाळी देशभक्ती, स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. जयाजी ही माझी थाळी आहे तुमची नाही.’

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Kumbh Mela : मुकणेतून अतिरिक्त पाणी आणणार; त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन जलशुद्धीकरण...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) नियोजनासाठी प्रशासनाने आता विषयनिहाय सखोल चर्चा करण्यावर भर दिला असून, सिंहस्थात आवश्यक असणारा पाणीप्रश्न आणि...