मुंबई | Mumbai –
अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलिसांवर टीका करताना मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर वाटू लागलं आहे, असे वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर
तिच्यावर टीका होऊ लागली. त्यातही कंगनानं 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिम्मत असेल, तर अडवा असं आव्हान शिवसेनेला दिले. कंगनानं दिलेल्या या आव्हानामुळे मात्र तिच्या वडिलांना चिंता वाटू लागली आहे. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावरून कंगनानं एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यावर लिहिलं की, या इमोशनल ब्लॅकमेलचं काय करायचं?
ऐकिकडे कंगना अशी विधानं करत सुटली असताना, तिच्या वडिलांना मात्र तिच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागली आहे. कंगनाचे वडील अमरदीप सिंह राणौत यांनी कंगनाच्या सुरक्षिततेसाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. मुंबईत जाण्यावरून त्यांनी कंगनाशी चर्चाही केली. कंगनाला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. कंगनाच्या सुरक्षिततेच खाजगी सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
कंगनानं शेअर केला व्हिडीओ…
कंगनानं व्हिडीओ पोस्ट करून लिहिलं की, तुम्ही माफियाशी लढू शकता, तुम्ही सरकारला आव्हान देऊ शकता, परंतु घरातील या इमोशनल ब्लॅकमेलला तुम्ही कसे हाताळू शकता? आज माझ्या घरी हेच घडलं…
कंगनानं शेअर केलेल्या व्हिडीओत तिचे वडील म्हणत आहेत की, आपल्याला कोणाशी पंगा घ्यायचा नाही. मला रात्री झोप आली नाही. रात्री 12वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत मी झोपलो नाही.