मुंबई | Mumbai
अभिनेत्री कंगना राणावत (actress kangana ranaut) ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरली होती. यामुळे कंगना विरोधात आता मुंबई पोलिसामध्ये (mumbai police) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंगनाच्या मुंबईतील कार्यालयात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला होता. यानंतर कंगनाने मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली होती. या तक्रारीमध्ये कंगनाने केलेल्या ट्वीट्सची आणि व्हिडिओची माहिती सुद्धा पोलिसांना देण्यात आली आहे.
काय म्हंटले आहे तक्रारीत…
अड. नितीन माने(Advocate Nitin Mane) यांच्यामार्फत विक्रोळी पोलीस ठाण्यात(vikroli police station) कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम ४९९ अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे माने यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कंगना हिने ९ सप्टेंबरला सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, तिने मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर केला असून, तिने जाणूनबुजून फिल्म ‘माफिया’शी संबंध जोडून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात कलम ४९९ अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माने यांनी तक्रारीद्वारे केली आहे.
काय म्हणाली होती कंगना..
कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत म्हंटले होते की, “उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझं घर तोडलं आणि मोठा बदला घेतलाय. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. वेळेचं चक्र आहे, कोणासाठीही नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत असंच मी समजेन. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं याची जाणीव मला आज झाली. मी या देशाला वचन देतेय की, मी केवळ अयोध्या नाही तर काश्मीरवरही सिनेमा बनवेन. आपल्या देशातील नागरिकांना जागरुक करणार. ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे, कारण याला देखील एक अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र.”