Thursday, October 1, 2026
HomeनगरPathardi : कानिफनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा

Pathardi : कानिफनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा

यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्ट आणि पोलिसांची संयुक्त कारवाई || भाविकांना दिलासा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

श्रीक्षेत्र मढी येथील प्रसिद्ध चैतन्य कानिफनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, भाविकांच्या सुविधेसाठी रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम शनिवारी (दि. 28) हाती घेण्यात आली. कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

अतिक्रमणांमुळे भाविक आणि नागरिकांना मोठी अडचण येत होती. वाहतूक कोंडी होत असल्याने यात्रेदरम्यान अपघाताचा धोका वाढला होता. यंदाची कानिफनाथ यात्रा महोत्सव दि. 2 मार्च ते 19 मार्च 2026 या कालावधीत होणार असल्याने, भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी ही मोहीम राबवण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, सरचिटणीस माधुरी मरकड, विश्वस्त उत्तम मरकड, दादासाहेब मरकड, रवींद्र आरोळे, कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांच्यासह पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, लक्ष्मण पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

पोलीस, होमगार्ड आणि देवस्थानचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी अतिक्रमण-धारकांना नोटिसा दिल्या होत्या. नोटिसमध्ये म्हटले आहे की, यात्रा कालावधीत मढी-पाथर्डी रोडवर दुकाने, हातगाड्या लावून अतिक्रमण केले असून, ट्रस्टच्या सूचनांचे पालन न केल्याने कारवाई करण्यात येईल. अतिक्रमणामुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास दखलपात्र गुन्हा नोंदवला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. नोटिस भविष्यात पुरावा म्हणून न्यायालयात दाखल केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

मढी-पाथर्डी रोड मोकळा
मनुष्यबळ, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साह्याने सकाळपासून सुरू झालेली ही मोहीम सायंकाळपर्यंत चालली. मढी-पाथर्डी रोडवरील अनेक दुकाने आणि हातगाड्या हटवण्यात आल्या. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते मोकळे झाले असून, विद्रुपीकरण दूर होऊन भाविकांना सुविधा मिळणार आहे. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याची भावना, स्थानिकांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Tribal Student Long March : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फुट; एक गट...

0
नाशिक | Nashik आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे (Tribal Student) प्रलंबित प्रश्न आणि आदिवासी मंत्र्यांसह मुख्य सचिव व आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...