Tuesday, April 29, 2025
Homeमनोरंजनसुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन

सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन

बेंगळुरू | Bengaluru

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार (Kannada actor Puneeth Rajkumar) यांचं निधन झालं आहे.

- Advertisement -

आज सकाळी पुनीत यांना बेंगळुरू (Bengaluru) येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये ( Vikram Hospital) दाखल करण्यात आलं होतं.

पुनीत यांना आज (शुक्रवारी २९ ऑक्टोबर) दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु होते.

रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

पुनीत राजकुमार यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. बालकलाकार म्हणून त्यांनी अनेक कन्नड चित्रपटात काम केले आहे. राज्यभरात त्यांचे असंख्य चाहते असून त्यांच्या अभिनय शैलीमुळे पुनीत राजकुमार यांना ‘पावर स्टार’ ही पदवी दिली होती. सुमारे सात महिन्यापूर्वी पुनीत आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बेळगावात आले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दाखल पात्र विद्यार्थ्यांसोबत निरक्षर व्यक्ती शोधा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून साक्षर केले जाणार आहे. यासाठी...