Friday, September 20, 2024
Homeनगरकापडबाजार अतिक्रमण व दहशतमुक्त करा

कापडबाजार अतिक्रमण व दहशतमुक्त करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शहरातील मोची गल्ली येथे 5 सप्टेंबर रोजी रस्त्यावर दुकाने मांडणार्‍या काही समाजकंटकांनी मोची गल्लीत महिलेला मारहाण करून घृणास्पद शिवीगाळ केली. भर बाजारपेठत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजकंटकांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, मोची गल्लीतील व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक त्यांच्या दहशतीला बळी पडत आहेत. बाजारपेठेत अतिक्रमण करणार्‍या या समाजकंटकांवर तातडीने कारवाई करून बाजारपेठेतील सर्व अतिक्रमणे काढण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेवून बाजारपेठ अतिक्रमण व दहशत मुक्त करावी, या मागणीचे निवेदन शहर भाजपच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिले.

यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, सरचिटणीस प्रशांत मुथा, हर्षल बोरा, अ‍ॅड. अविनाश साकला, बंटी डापसे, ज्ञानेश्वर धिरडे, पंडित वाघमारे, बाळासाहेब खताडे, अनिल निकम, सुरेश लालबागे, गोपाल वर्मा व साहिल शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजारपेठेतील व्यापार्‍यांवर सातत्याने हल्ले करून दुकानांसमोर अतिक्रमण करून दहशत पसरवण्याचे प्रमाण वाढत आहे. मोची गल्ली, कापडबाजारात रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात हातगाडीचे अतिक्रमण असून त्यामुळे रस्त्याने चालणे पण मुश्किल होत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून बाजारपेठेतील गर्दी आहे.

या अतिक्रमणांमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. 5 सप्टेंबरला ज्यांनी महिलेला मारहाण केली त्यांचीच या परिसरात मोठी दहशत असून त्यांच्या अतिक्रमणामुळेच नेहमी या ठिकाणी वाद निर्माण होतात. या वादाचा संपूर्ण शहरावर परिणाम होत असून शहराच्या शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार व मोची गल्ली भागातील अतिक्रमणे ताबडतोब काढून शहराची शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या