Saturday, July 27, 2024
Homeनाशिकदुसऱ्या सोमवारी कपालेश्वर महादेव मंदिर भाविकांसाठी बंद

दुसऱ्या सोमवारी कपालेश्वर महादेव मंदिर भाविकांसाठी बंद

पंचवटी | Panchavti

करोनामुळे (Corona) यंदा सलग दुसऱ्या वर्षी रामकुंडावरील (Ramkunda) कपालेश्वर महादेव मंदिर (Kapaleshwar Mahadev Temple) भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे…

- Advertisement -

पहिल्या श्रावणी सोमवार (Shravani Somwar) निमित्त पोलिसांनी रामकुंडाच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बंद केले होते. दुसऱ्या सोमवारी (दि.१६) हे नियम पोलिसांनी शिथिल करीत केवळ कपालेश्वर मंदिरासमोर बॅरिकेड्स लावून मार्ग बंद केले असल्याचे चित्र होते.

रामकुंडावरील प्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिर बंद असले तरीही श्रावणी सोमवारी निमित्त दिवसभर भाविक पहिल्या पायरीवर नतमस्तक होत होते. तर सायंकाळी साडेचार वाजता कपालेश्वर मंदिर प्रांगणात मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची पालखी काढण्यात आली.

जगभरात प्रसिद्ध असलेल्या कपालेश्वर मंदिरात सोमवारी (दि.१६) पहाटे पाच वाजता जल, दुग्ध अभिषेक करून, रुद्र पठण करण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेचार वाजता पुरातन चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची पालखी काढण्यात आली.

मंदिरा भोवती तीन प्रदक्षिणा करून, रामकुंडातील पाण्याने मुखवट्यास जलअभिषेक करण्यात आला. यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कपालेश्वर शिवपिंडीस शृंगार व साज करून महाआरती करण्यात आली. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी कपालेश्वर मंदिर भोवती बॅरिकेड्स लावून भाविकांना मंदिर बंद केले आहे.

यावेळी मात्र रामकुंडच्या दिशेने येणारे मार्ग मालेगाव स्टँड (Malegoan Stand), इंद्रकुंड (Indrakund), मालवीय चौक, शनी चौक, जुना भाजी बाजार पटांगण लगत साई बाबा मंदिर परिसरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त करण्यात आलेली बॅरिकेडिंग करण्यात आली नव्हती.

केवळ मंदिर समोरील परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक भाविक कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवर दर्शन घेत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या