Friday, June 14, 2024
Homeनगरकापूरवाडी परिसरात महसूल पथकावर हल्ला

कापूरवाडी परिसरात महसूल पथकावर हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

डबर उत्खन्न करणार्‍यांवर कारवाई करत असतांना 25 ते 30 जणांनी महसूल पथकातील काही कर्मचार्‍यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. ही घटना कापुरवाडी ते पिंपळगाव उज्जैनी रस्त्यावर 20 तारखेला रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

सुदर्शन संभा भगत (रा. कापुरवाडी, ता. जि. नगर), चांगदेव गोवर्धन आढाव (रा. पिंपळगाव उज्जैनी, ता. जि. नगर), युवराज धाडगे (पुर्ण नाव माहित नाही), संभाजी गोवर्धन भगत (रा. कापुरवाडी, ता. जि. नगर), व 20 ते 25 अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तलाठी गणेश बबनराव आगळे (वय 38, रा. गोकुळनगर, भिस्तबाग) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार कापुरवाडी गावात अवैध गौण खजिन उत्खन्न करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी महसूलचे पथक गेले होते.

त्यावेळी कापुरवाडी ते पिंपळगाव उज्जैनी रस्त्याच्या जवळ एक लाल रंगाचा ब्लास्टीग ट्रॅक्टर विना नंबरचा हा डबर उत्खनन करतांना दिसला. तसेच एका पोकलेनच्या सहाय्याने विना क्रमांकाच्या डंपरमध्ये डबर भरण्याचे काम सुरू होते. त्यानंतर पथकाने ब्लास्टीग ट्रॅक्टर, पोकलेन व डंपर ताब्यात घेतले असता, आरोपींनी फिर्यादी व पथकातील कर्मचारी यांच्या अंगावर धावून जावून काही कर्मचार्‍यांना धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी करीत चापटीने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एम. के. बेेंडकोळी हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या