Wednesday, December 4, 2024
Homeनगरजलजीवन योजनेतील भ्रष्टाचार चौकशीच्या मागणीसाठी सरपंच व सदस्याचे उपोषण

जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार चौकशीच्या मागणीसाठी सरपंच व सदस्याचे उपोषण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील कारेगाव येथील जलजीवन मिशन योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी कारेगावचे सरपंच आनंद वाघ व सदस्य सुनील पटारे यांनी श्रीरामपुरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

- Advertisement -

कारेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 54 लाख रुपयांचे काम नोव्हेंबर 2022 मध्ये पूर्ण झाले असून या कामामध्ये वापरलेले पाईप व इतर मटेरियल सुमार दर्जाचे आहे. तसेच योग्य त्या खोलीपर्यंत पाईप न टाकल्याने पाईपलाईन वारंवार लिक होत आहे. नवीन पाईपलाईनला जोडण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांपर्यंत पिण्याचे पाणी पोहचले नाही. अनेकवेळा या योजनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप याबाबत कुठलीही चौकशी केली नाही. तरी या सर्व कामांची दक्षता व गुणनियंत्रक मंडळ नाशिक मार्फत तपासणी करावी, या मागणीसाठी ग्रापंचायत सदस्य सुनील पटारे व सरपंच आनंद वाघ यांनी उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान कारेगावचे सरपंच आनंद गोरक्षनाथ वाघ व ग्रा.पं. सदस्य सुनील गंगाधर पटारे यांच्या विरोधात ठेकेदार निलेश बाबुराव निमसे यांनी श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. श्री. निमसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 1 जून 2022 रोजी जलजीवन मिशन अंतर्गत कारेगाव नळ पाणीपुरवठा पुनर्रजोडणीचे काम मला मिळाले होते. सदर काम पं.स. पाणीपुरवठा विभागाच्या देखरेखीखाली पूर्ण करून जि.प. कार्यकारी अभियंता यांच्या पाहणीने अंतरीम अहवाल तयार करून नोव्हेंबर 2022 अखेर या कामाचे संपूर्ण बिल मला मिळाले असून काम चालू होते. त्या दरम्यान सरपंच आनंद वाघ तसेच ग्रा.पं. सदस्य सुनील पटारे म्हणाले, सरपंच यांना अडचण आहे. त्यांना काही पैसे द्यावे लागतील. यातून मी त्यांना 49 हजार रुपये दिले. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण हिशोबाने 3 टक्के प्रमाणे मला रक्कम पाठवा, अन्यथा तुमची सी.ओ. यांच्याकडे तक्रार करील, अशी धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या