Wednesday, May 29, 2024
Homeनगरकारेगावच्या तरुणास ओव्हरब्रीजजवळ लुटले

कारेगावच्या तरुणास ओव्हरब्रीजजवळ लुटले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लोणी येथून गायी विकून घरी जात असताना श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवर असणार्‍या ओव्हर ब्रीजजवळ एकास मारहाण करून त्याच्याजवळील 73 हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल लुटून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील बालम हसन पठाण (वय 28) हा तरुण लोणी येथून तीन गायी विकून त्याचे पैसे घेऊन श्रीरामपूर येथे ओव्हरब्रिजचे दक्षिण बाजूस शेती महामंडळांच्या शेतातून रस्त्याने जात असताना अचानक मागून दोन मोटारसायकलवर इसम आले. त्यांनी गाडीला धक्का लागला असे म्हणत कंबरेच्या बेल्टने आपणास मारहाण सुरू केली आणि त्याच्याजवळील 73 हजारांची रोकड आणि मोबाईल चोरून नेला.

सदर गुन्हा घडल्याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंबंधी आदेश दिले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बालम हसन पठाण, (रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर) याने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 468/2022 प्रमाणे अज्ञात इसमांविरुध्द भादंवि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. देवरे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या