Friday, April 25, 2025
Homeक्राईमCrime News: धक्कादायक! एक वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईची आत्महत्या

Crime News: धक्कादायक! एक वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईची आत्महत्या

कर्जत (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील खांडवी येथे एक वर्षाच्या मुलाला फाशी दिल्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
साक्षी कुमार कांबळे, स्वरूप कांबळे अशी मृत्यू झालेल्या मायलेकाची नावे आहे.

- Advertisement -

दोनच दिवसांपूर्वी स्वरूप कांबळे याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी डीजे देखील लावण्यात आला होता. मयत साक्षी व कुमार कांबळे यांचा प्रेम विवाह होता. दोघेही आनंदाने राहत असताना अचानक राहत्या घरामध्ये साक्षी कांबळे या आईने पत्र्याच्या खाली असलेल्या लोखंडे अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तत्पूर्वी तिने आपल्या एक वर्षाच्या मुलाला देखील गळफास देऊन मारले. याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...