Saturday, May 4, 2024
Homeनगरकर्जत : काल झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिके भुईसपाट

कर्जत : काल झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिके भुईसपाट

कर्जत | प्रतिनिधी | Karjat

कर्जत तालुक्यातील कोरेगावमध्ये काल झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या पिकांची खूप मोठे नुकसान झाले आहे यामध्ये ऊस, मका, बाजरी, उडीद, तुर, या पिकांचा समावेश आहे

- Advertisement -

कर्जत तालुक्यातील कोरेगाव परिसरामध्ये सोमवारी जोरदार वादळीपाऊस पडला या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील खरीप पिकांची काढणी अजून पूर्ण झालेले नाही. उडीद बाजरी मका हे सर्व पीक काढणीला आले आहेत काही ठिकाणी काढणी सुरू आहे. असे असताना या परिसरात जोरदार वादळी पाऊस पडला. या मुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी उडीद आणि बाजरी काढून शेतातच ठेवला तर तो भिजून यांच्या नुकसान झाले आहे. या शिवाय ज्या शेतकऱ्यांना काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. ते प्रतीक्षेत असतानाच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्या मुळे पिके पाण्यात गेली आहेत.

मागील दोन दिवसांपासून कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. आकाशात मोठ्या प्रमाणामध्ये ठळक जमा होत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडेल असे वाटत असतानाच पाऊस काय होत आहे. मात्र सोमवारी कर्जत सह परिसरामध्ये व तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी पाऊस पडला. या वादळी पावसामुळे ऊस पीक अनेक ठिकाणी भुईसपाट झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या