Friday, March 28, 2025
Homeनगरकर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांना भूसंपादनाचे 100 कोटी लवकरच मिळणार

कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांना भूसंपादनाचे 100 कोटी लवकरच मिळणार

कर्जत (तालुका प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांना भूसंपादनाची 100 कोटी रक्कम लवकरच मिळणार असून अस्तरीकरणासाठी 35 कोटी रुपये निधी मिळाला आहे.  पाठपुरावा केल्यामुळे शक्य झाले असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी बोलताना केले.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुकडी चारीच्या अस्तरीकरणाला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून सुरुवात झाली आहे. तालुक्यातील किमी 1 ते 5 चिलवडी शाखा कालवा, किमी 6 ते 9 चिलवडी शाखा कालवा, किमी 6 ते 15 कर्जत शाखा कालवा, किमी 215 ते 226 या चार्यांचे काम सुरू असुन आमदार रोहित पवार यांनी काल उदघाटन केले.

- Advertisement -

यावेळी पाटबधांरे विभागाचे कार्यकारी आभियंता रामदास जगताप,संभाजी दरेकर,आर एम विभूते, विजय मोढळे, अ‍ॅड सुरेश शिंदे, ंसंग्राम पाटील, हेमंत मोरे, नितीन धांडे, रामकिसन साळवे, रूषीकेष धांडे, माउली सायकर, बहुमान गदादे महाराज, राहून नवले, नाना धांडे, आजिनाथ राउत,किसन गदादे, श्री शिरसागर श्री दवणे यांचेसह अनेक पदाधिकारी व मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

चिलवडी शाखा कालव्याचे एकूण लाभक्षेत्र 13694 हेक्टर आहे. त्यापैकी कर्जत तालुक्यातील एकूण 7259 हेक्टर एवढे लाभक्षेत्र आहे व त्यातील उर्वरित 6435 हे. क्षेत्र हे करमाळा तालुक्यात मोडते. या चारीचे कालवा मुखाशी चारीची विसर्ग क्षमता 312 क्युसेक एवढी असून सध्याच्या तांत्रिक अडचणीमुळे सध्या ही चारी जास्तीतजास्त 200 क्युसेकने चालू शकते.

संकल्पित विसर्गाने चारी चालवण्यासाठी मुख्य कालव्यावर 192/140 येथे काटनियमाक प्रस्तावित केले आहे. आणि त्याचे काम होणे बाकी आहे. हे काम सन 2020 पर्यंत पूर्ण होणार असून संकल्पीत विसर्ग सोडणे शक्य होईल. चिलवडी शाखा कालव्याचे 13694 हे क्षेत्राकरिता पाच वितरीका आहेत.

तसेच शाखा कालव्यावर डाव्या व उजव्या बाजूच्या मिळून 29 लघू वितरिका तसेच 46 विमाचके आहेत. मात्र अपुर्‍या कर्मचार्‍यामुळे पाणी वितरण करणे जिकिरीचे ठरते. सध्या अस्तरीकरणाच्या कामासाठी सुमारे 35 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ मार्च २०२५ – सामर्थ्याचे बळ

0
निश्चयाचे बळ अंगी असेल तर अशा व्यक्तीचा स्वतःकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाला चमत्कार वाटू शकेल अशी कामे अशी व्यक्ती करू शकते. ‘निश्चयाचे...