Sunday, May 19, 2024
Homeनगरकर्जत एमआयडीसीसाठी लवकरच कार्यवाही

कर्जत एमआयडीसीसाठी लवकरच कार्यवाही

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत-जामखेड मतदारसंघात मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनात लक्षवेधी सुचना मांडली. याबाबत उच्च अधिकार समितीची या औद्योगिक क्षेत्रास तत्वत मान्यता असून शासन लवकरच पुढील कार्यवाही करेल असे निवेदन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज सभागृहात केले.

- Advertisement -

आ. रोहित पवार यांनी 2019 च्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात औद्योगिक वसाहत मतदारसंघात स्थापन व्हावे याबाबत तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. अखेर कर्जत तालुक्यातील मौजे पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली. 14 जुलै 2022 च्या 143 व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मौजे पाटेगाव व खंडाळा तालुका कर्जत येथील 458.72 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम 1961 च्या तरतुदीनुसार लागू करण्यास तत्वता मान्यता देण्यात आली.

परंतु अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही. त्यामुळे ही बाब आ.रोहित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात 23 डिसेंबर 2022 रोजीच्या विधीमंडळाच्या कामकाजातील लक्षविधी सूचनेद्वारे सरकारचे याकडे लक्ष वेधले आणि हा मुद्दा उपस्थित केला. लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या निवेदनात कर्जत येथील पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आल्याची बाब मान्य केली व कर्जत तालुक्यातील मौजे पाटेगाव व खंडाळा येथील 458.72 हेक्टर क्षेत्रास उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असून औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. त

सेच सदर औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूकदारांनी भूखंडाची मागणी केल्यास पास थ्रू पद्धतीने भूखंड उपलब्ध करून देण्याची तजविज ठेवलेली आहे. असे विधीमंडळाच्या पटलासमोर निवेदनाद्वारे जाहीर केले. त्यामुळे लवकरच कर्जत तालुक्यातील खंडाळा व पाटेगाव येथे औद्योगिक क्षेत्र विकसित होईल व परिसरातील बेरोजगार युवकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. असा विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या