Friday, December 13, 2024
Homeनगरएमआयडीसी प्रश्नी संतप्त नागरिकांचा कर्जतला रास्तारोको

एमआयडीसी प्रश्नी संतप्त नागरिकांचा कर्जतला रास्तारोको

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत – जामखेड मतदार संघातील एमआयडीसीच्या प्रश्नावर शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेससह संतप्त युवक व नागरिकांनी कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आमदार राम शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत व शासनाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

- Advertisement -

या आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, दीपक शिंदे, नगराध्यक्ष उषा राऊत, गटनेते संतोष मेहत्रे, माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, नगरसेविका छाया शेलार, ज्योती शेळके, हर्षदा काळदाते, विशाल मेहत्रे, प्रसाद ढोकरीकर, उपगटनेते प्राध्यापक सतीश पाटील, श्रीमंत शेळके, रवींद्र सुपेकर, भूषण ढेरे, भाऊसाहेब तोरडमल, अभय बोरा, रजाक झारेकरी, लालासाहेब शेळके, राजश्री तनपुरे, सचिन सोनमाळी, संतोष नलावडे, नामदेव थोरात,महादेव खंदारे, स्वप्निल तनपुरे, राहुल खराडे, दादा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गटनेते संतोष मेहत्रे म्हणाले, कर्जत जामखेड तालुक्यातील युवकांसाठी आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसीसाठी प्रयत्न केले, सर्व बाबींची पूर्तता झालेली असताना केवळ याठिकाणी पराभूत झालेले भाजपचे आमदार व भारतीय जनता पक्षाचे काही नेते हे जाणीवपूर्वक विरोध करीत आहेत. मंजूर असलेल्या एमआयडीसीला सरकार अंतिम मंजुरी देत नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेण्याचे आश्वासन देऊ नये कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व युवकांची व आमदार रोहित पवार यांची फसवणूक केली आहे.

शहराध्यक्ष सुनील शेलार म्हणाले, आमदार राम शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत हे याचे श्रेय आमदार रोहित पवार यांना मिळू नये म्हणून ही एमआयडीसी होऊ देत नाहीत हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. भविष्य काळामध्ये एमआयडीसी झाली नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन उभे करू.

नामदेव राऊत म्हणाले, मी देखील राजकारणामधील सक्रिय कार्यकर्ता असून दहा वर्ष आमदार राम शिंदे यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून काम केले परंतु त्यांनी कधीही कर्जत एमआयडीसीच्या प्रश्नावर पुढाकार घेतला नाही. जामखेड येथील एमआयडीसी बाबत आम्ही पाठपुरावा केला तरी देखील यांनी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. जर ही एमआयडीसी होऊ देणार नसेल तर कर्जत जामखेड मतदार संघातील हे हजारो युवक भाजपला निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवतील.यावेळी विशाल मेहत्रे, प्रसाद ढोकरीकर, भास्कर भैलूमे स्वप्निल तनपुरे यांची भाषणे झाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या