Tuesday, June 16, 2026
HomeनगरAhilyanagar : बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यत अंत्यविधी नाही

Ahilyanagar : बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यत अंत्यविधी नाही

खारेकर्जुनेमध्ये गाव, शाळा बंद || ग्रामस्थांचा निर्णय

अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar

खारेकर्जुने (Karjune Khare)  येथे बिबट्याने पाच वर्षे चिमुरडीला उचलून जिवे मारल्याच्या (Leopard Attack Girl Death) घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी गाव बंद ठेवले. जोपर्यत बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यत अंत्यविधी करणार नाही असा इशारा (Hint) ग्रामस्थानी दिला. गावातील जिल्हा परीषद व माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथे पालकांच्या डोळ्यादेखत पाचवर्षीय रियांका सुनिल पवार या मुलीला बिबट्याने (Leopard) उचलून नेले. या घटनेमुळे गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रभर या मुलीचा शोध ग्रामस्थांनी घेण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी सकाळी येथील शाळेच्या मागील बाजूस हिंगणगाव रस्त्यालगत मुलीचा अर्धवट मुतदेह (Dead Body) सापडला. या घटनेच्या निषेधार्थ खारेकर्जुने येथील ग्रामस्थांनी तातडीची बैठक बोलवली. जोपर्यत बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यत गाव बंद (Village Close) ठेवण्यात येईल तसेच मुलीचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला. गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आली होती.

नगर तालुक्यातील बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच खारेकर्जुने येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळावी, या मागणीचे निवेदन पंचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यानी तहसीलदार संजय शिंदे यांना दिले.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत आहे. हिंगणगाव, खातगाव, खारेकर्जुने, टाकळी, निमगाव, हमिदपुर अशा परिसरातील गावांमध्ये फिरत आहे. खारेकर्जने येथे अप्रिय घटना घडली. या सर्व परिसरात कामगार वर्ग, विद्यार्थी, शेतकरी वर्गात भयावह परिस्थिती आहेत. परिसरात अनेक शाळा, तसेच महाविद्यालये असून विदयार्थाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभाग दुर्लक्ष करत असून त्यांची यंत्रणा अपुरी पडत आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी तात्काळ सर्व आवश्यक ठिकाणी पिंजरे लावून बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी जिल्हा परिषद अर्थ बांधकाम समिती उपाध्यक्ष प्रताप शेळके, माजी सभापती रामदास भोर, बि. डी. कोतकरसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : जिल्ह्यात नऊ ठिकाणी केंद्रे; ६१९...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) एका जागेसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान (Voting) होणार आहे. या...