Friday, May 2, 2025
Homeनाशिककर्मवीर काका-तात्या हे अद्वितीय गुरुशिष्य: मांढरे

कर्मवीर काका-तात्या हे अद्वितीय गुरुशिष्य: मांढरे

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

पद्मभूषण कर्मवीर काकासाहेब वाघ (Padma Bhushan Karmaveer Kakasaheb Wagh) आणि सहकार महर्षी माधवराव तात्यासाहेब बोरस्ते (Sahkar Maharshi Madhavrao Tatyasaheb Boraste) ह्या गुरु शिष्यांसारखी जोडी सामाजिक (social) किंवा राजकीय (political) क्षेत्रात होणे हा केवळ अपवाद असतो. दोघांनीही आपल्या कार्यकर्तुत्वाने गगनाला कवेत घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

केवळ समाजहिताचा विचार करून समाज विकासासाठी आपल्या आयुष्यभर प्रयत्न करणारे असे गुरु शिष्य अत्यंत विरळ असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Pune Division Education Commissioner Suraj Mandhre) यांनी केले. सिन्नर महाविद्यालयात वाघ आणि बोरस्ते यांच्या संयुक्त पुण्यतिथी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. वाघ यांनी अत्यंत निस्पृह आणि निस्वार्थीपणे केवळ समाजाचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून आपले जीवन व्यतीत केले.

बहुजन समाजाच्या (bahujan community) शिक्षणासाठी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या (Maratha Vidya Prasarak Samaj Education Institute) रूपाने त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे ते म्हणाले. खेड्यापार्‍यापर्यंत आणि दिन-दलितांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी वाघ यांचे योगदान फार मोठे आहे.

राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य स्मरणात ठेवले पाहिजे. बोरस्ते यांच्या काळात महाराष्ट्रातील (maharashtra) पहिल्या क्रमांकाचा साखर कारखाना (Sugar factory) म्हणून निफाड सहकारी साखर कारखान्याचे (Niphad Cooperative Sugar Mills) योगदान होते.

निसाकाचे दीर्घकाळ चेअरमन त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी फार मोठे कार्य केले आहे. त्यांच्या काळात निसाकाची भरभराट झाली. सभासदांचे हित हेच एकमेव ध्येय ठेवून त्यांनी कारखान्याला झालेल्या नफ्यातून अनेक शिक्षण संस्थांना मदत केल्याचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी सांगितले.

रस्त्यांचे बांधकाम, पाणी साठवण तलाव, जयश्री बँकेची स्थापना असा त्यांचा कार्याचा व्याप अनेक क्षेत्राशी निगडित होता. अशा या महान गुरु-शिष्यांचा आदर्श जपत आपल्या जीवनाची पुढील वाटचाल होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही पवार, प्रा. व्ही. एस. सोनवणे, प्रा. एस. डी. इंगळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही. व्ही गावले, एस. एच. डावरे, योगेश भगत यांनी परिश्रम घेतले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

0
अहिल्यानगर | प्रतिनिधी  अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. २ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले....