Monday, May 27, 2024
Homeनाशिककर्मवीरांचे कार्य दीपस्तंभासारखे

कर्मवीरांचे कार्य दीपस्तंभासारखे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

1914 साली कर्मवीरांनी लावलेले रोपटे वाढवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देऊन आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. रावसाहेब थोरातांनी संस्थेसाठी आयुष्य वेचले. गणपतदादा मोरे, डी. आर. भोसले, अण्णासाहेब मुरकुटे यांनी देखील मोठे कार्य उभारले. गावोवावी फिरून शेतकर्‍यांच्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले. प्रतिकूल परिस्थितीत कर्मवीरांनी उभारलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी केले, ते मविप्र संस्थेच्या समाजदिन सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते.

- Advertisement -

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती डी. बी. मोगल, माणिकराव बोरस्ते, डॉ. तुषार शेवाळे, अरविंद कारे, अ‍ॅड. दौलतराव घुमरे, डॉ. अभिमन्यू पवार, डॉ. विश्राम निकम, अंबादास बनकर आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन व मविप्र पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. सुनील ढिकले यांनी भारत हा शिक्षणामुळे जगात अग्रेसर असून राजर्षी शाहू महाराज, म.फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला महत्व दिले.चांगली पिढी घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रात संस्थेचे मोठे योगदान दिलेले आहे. कोणत्याही देशाचे मूल्यमापन हे त्या देशातील विद्यापीठ व संधोधानातून ठरते असे सांगितले. ठाकरे यांनी आपल्या मनोगतात सत्यशोधक विचारांतून संस्थेची उभारणी झाली असून संस्थेला कर्मवीर, आश्रयदाते, शिक्षकांची मोठी परंपरा लाभली असून रावसाहेब थोरात यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले.

प्रास्ताविकात उपसभापती डी. बी. मोगल यांनी संस्थेच्या वाटचालीचा व कर्मवीरांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. समाजदिनाचे औचित्य साधून संस्थेतील सेवक, विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये विविध पुरस्करांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. तुषार पाटील यांनी तर आभार उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या