Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशभाजप आमदाराच्या पुत्राला ४० लाखांची लाच घेताना पकडलं; घरात सापडलं ६ कोटींचं...

भाजप आमदाराच्या पुत्राला ४० लाखांची लाच घेताना पकडलं; घरात सापडलं ६ कोटींचं घबाड

कर्नाटक | Karnataka

अवघ्या काही महिन्यांत कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपा आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार यांना तब्बल ४० लाखांची लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. वडिलांच्या बंगळुरू येथील कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) कार्यालयातून ही अटक करण्यात आली.

Viral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…

यानंतर लोकायुक्त अधिकारी प्रशांत यांच्या घरी पोहोचले. येथे त्यांना ६ कोटी रोख मिळाले. मोजणी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी नोटांचे बंडल बेडवर ठेवले होते. तर, मुलाच्या कार्यालयातून २ कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.

कर्नाटकमध्ये सध्या भाजपचं सरकार असून विरोधकांकडून सातत्याने भाजप नेत्यांवर लाचखोरी आणि टेंडरमध्ये टक्केवारी, पैशांची अफरातफरीचा आरोप केला जात आहे. प्रशांत यांनी एका टेंडर प्रक्रियेला क्लिअर करण्यासाठी ८० लाख रुपयांची लाच मागितली होती.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची चौकशी करा; मनसेच्या नेत्याच्या मागणीने खळबळ

त्याचपैकी, ४० लाख रुपयांची रक्कम स्विकार करताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रशांत यांना रंगेहात अटक केली. लोकायुक्तांकडून आता या घटनेची व कागदपत्रांची सखोल चौकशी होत आहे.

इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा; कधीकाळी विराट कोहलीला केलं होतं प्रपोज

दरम्यान भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी KSDL च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुलाने ज्या टेंडरमध्ये लाच घेतली त्यात माझा सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले. विरुपक्षप्पा यांच्या राजीनाम्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, लोकायुक्त पुन्हा आणण्याचे उद्दिष्ट राज्यातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या