Friday, June 21, 2024
Homeमुख्य बातम्याKarnataka : निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा झटका! डीके शिवकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल......

Karnataka : निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा झटका! डीके शिवकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल… प्रकरण काय?

श्रीरंगपट्टण | Srirangapatna

- Advertisement -

कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka Assembly Elections 2023) निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

यादरम्यान प्रदेश काँग्रेस (Congress) अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलाय. स्थानिक न्यायालयाच्या निर्देशानुसार मंड्या ग्रामीण पोलिसांनी डीके शिवकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी कनेक्शन, माजी स्वीय सहाय्यकांचा आरोप

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांड्या जिल्ह्यातील बेनिवहल्ली येथे ‘प्रजा ध्वनी यात्रा’ आयोजित केली होती. तेव्हा रोड शोदरम्यान डीके शिवकुमार यांनी काही लोकांवर नोटा उधळल्या होत्या. डीके शिवकुमार ५००-५०० रुपयांच्या नोटा उधळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.

अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण

अशात नोटा फेकल्याप्रकरणी मांड्या येथील स्थानिक न्यायालयाने डीके शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, मांड्या ग्रामीण पोलिसांनी डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस डीके शिवकुमार यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिर्डी पाळणा दुर्घटनेतील जखमी दाम्पत्याला आयुष्यभरासाठी आले अपंगत्व

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) ३० मार्च (बुधवार) रोजी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. कर्नाटक राज्याची ही पंधरावी विधानसभा निवडणूक आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका १० मे रोजी एकाच टप्प्यात होणार आहेत. निवडणुकीचे निकाल १३ मे रोजी जाहीर होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या