Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याकर्नाटकात काँग्रेसचा सावध पवित्रा, ‘ऑपरेशन लोटस’ टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय

कर्नाटकात काँग्रेसचा सावध पवित्रा, ‘ऑपरेशन लोटस’ टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय

बंगळुरू | Bangalore

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दुपारपर्यंत राज्यातील भविष्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल, अशी आशा निवडणूक अधिकाऱ्यांना आहे.

- Advertisement -

मात्र मतमोजणीदरम्यान कल हाती येण्यास सुरूवात झालेली आहे. यानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत आघाडी घेतल्याचं चित्र आहे. यानंतर आता ऑपरेशन लोटस’ टाळण्यासाठी काँग्रेसने आधीच खबरदारी घेतली आहे.

Weather Update : राज्यात उष्णतेची लाट, ७२ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे

काँग्रेसने सर्व आमदारांना दाखले घेऊन बंगळुरूला येण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्नाटकातील तीन हवाई पट्टीवर काँग्रेसने छोटी विमाने तैनात केली होती. प्रत्येक पट्टीवर पक्षाच्या राज्यस्तरीय जबाबदार नेत्याची तैनाती करण्यात आली. त्या भागातील विजयी आमदारांना घेऊन एक विमान बेंगळुरूला येईल. तर फक्त जवळच्या आमदारांनाच रस्त्याने आणलं जाईल.

Accident : प्रवाशांसह बस पैनगंगा नदीत कोसळली, महिला प्रवाशाचा मृत्यू तर १७ जण जखमी

हेलिकॉप्टर आणि उड्डाणाची तयारी सुरू आहे. बेळगाव धारवाड हुबळी गुलबर्गा बिलारी येथे हेलिकॉप्टर आणि उड्डाणाची व्यवस्था करण्यात आली आहे. निकालानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपला कोणत्याही प्रकारे संधी मिळू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. प्रत्येक मिनिटाचा अहवाल घेतला जात आहे. प्रत्येक सीटचा मागोवा घेतला जात आहे. सर्व आमदारांना कनेक्टिंग पॉईंट्सवर पोहोचल्यानंतर बेंगळुरूला येण्यास सांगितलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आमदार बच्चू कडू यांनी थेट तारीख सांगितली, म्हणाले…

दरम्यान, काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, मतमोजणी सुरू असतानाच काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा दावा भाजप करत आहे. मात्र, हा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी फेटाळून लावला आहे. “कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने जनतेला पाच मोठी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांची अंमलबजावणी कशी करायची? त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही बैठका घेत आहोत. कारण ज्या पद्धतीने ‘एक्झिट पोल’ समोर आले आहेत, त्यानुसार उद्या 6 कोटी कन्नडिग जिंकणार आहेत, असा आमचा विश्वास आहे. हा विजय त्या सर्वांचा आहे ज्यांनी 40 टक्के भ्रष्टाचाराचा पराभव केला आणि काँग्रेसच्या पाच आश्वासनांवर विश्वास ठेवला. या पाच योजना कशा राबवायच्या? त्यामुळे आम्ही बैठका घेत आहोत. कर्नाटकातील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. कर्नाटकच्या नवीन भविष्यासाठी उद्याचा सूर्यप्रकाशाचा पहिला किरण असेल.”

- Advertisment -

ताज्या बातम्या