Tuesday, April 23, 2024
HomeराजकीयKarnataka Election 2023 : बेळगावमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरस; एकीकरण समितीची पिछेहाट

Karnataka Election 2023 : बेळगावमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरस; एकीकरण समितीची पिछेहाट

मुंबई | Mumbai

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेचा (Karnataka Elections) निकाल आज जाहीर होत आहे. २२४ सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. अशातच बेळगावमध्ये (Belgaon) मराठी माणसांचा आवाज असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला (Maharashtra Ekikaran Samiti) घवघवीत यश मिळेल, असा अंदाज होता. पंरतु, हा अंदाज चुकीचा ठरताना दिसत आहे…

- Advertisement -

कर्नाटकची उपराजधानी आणि सीमावासियांचा आत्मा असलेल्या बेळगावमध्ये काँग्रेसने १८ पैकी ११ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णत: निराशा होताना दिसत आहे. बेळगाव दक्षिण आणि खानापूर या दोन मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये चुरशीची लढत होत असून निपाणी मतदारसंघातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

Karnataka Election Results 2023 : काँग्रेसचे ५ उमेदवार तर जेडीएसचा १ उमेदवार विजयी

सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रवादीचे उत्तम पाटील आघाडीवर होते. मात्र त्यानंतरते पिछाडीवर असून भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी आघाडी घेतली होती. मात्र यानंतरपुन्हा आघाडी बदलून उत्तम पाटील १५८२ मतांनी आघाडीवर होते. तर २५९ मतांनी यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी, ग्रामीण मतदार संघातून लक्ष्मी हेब्बाळकर, गोकाक मतदार संघातून रमेश जारकीहोळी आघाडीवर आहेत.

कर्नाटकात काँग्रेसचा सावध पवित्रा, ‘ऑपरेशन लोटस’ टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय

तसेच खानापूर मतदारसंघात भाजपचे विठ्ठल हलगेकर हे १८७५५ मते घेत आघाडीवर होते. तर विद्यमान आमदार अंजली निंबाळकर हे १२००० मतांनी मागे आहेत. याशिवाय बेळगाव उत्तर मतदारसंघात भाजपचे रवी पाटील हे १२६३० मतं घेत आघाडीवर असून त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे असिफ उर्फ राजू शेठ हे ११९६६ मते घेत पिछाडीवर आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अमर येलोरकर यांना १२९६ मते मिळाली आहेत.

याशिवाय बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे अभय पाटील आघाडीवर होते. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर आठ हजार मतांनी पिछाडीवर होते. मात्र आता महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांनी अभय पाटील यांना पिछाडीवर टाकले आहे. ग्रामीण भागातून एकीकरण समितीला मताधिक्य मिळत असल्याचं चित्र आहे

दुसरीकडे, कर्नाटकात काँग्रेसला एकही संधी हातातून निसटू द्यायची नाही. यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तेथे उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या