Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशकाय सांगता! लाडक्या बाप्पाच्या सजावटीसाठी दोन कोटींच्या नोटा अन् ५० लाखांची नाणी......

काय सांगता! लाडक्या बाप्पाच्या सजावटीसाठी दोन कोटींच्या नोटा अन् ५० लाखांची नाणी… पाहा VIDEO

बंगळूरु | Bengaluru

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायाचं स्वागत करण्यात आलं आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांमध्ये भाविकांनी सुंदर आणि आकर्षक गणेशमूर्तीची खरेदी करत उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. बाप्पाचा मखर सुंदर आणि आकर्षक असावा, यासाठी असंख्य भाविक प्रयत्न करत असतात. कर्नाटकातील एका भाविकाने चक्क नोटांच्या मखरामध्ये गणपती बाप्पाला बसवलं आहे. या गणपती बाप्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूरुमधील एका मंदिरात चलनी नोटांनी संपूर्ण मंदिर आणि मखर सजवण्यात आलं आहे. तब्बल दोन कोटी रुपयांच्या चलनी नोटा आणि नाणी यांनी बाप्पाचा मखर सजवण्यात आला आहे. मंदिरातील सजावट आणि डेकोरेशन चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बंगळुरुच्या पुत्तेनहल्लीतील श्री सत्य गणपती मंदिरात या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मखर साजवण्यासाठी या मंदिरात 10, 20, 50 तसेच 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा वापर केला आहे. बऱ्याच ठिकाणी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा देखील वापरण्यात आल्यात.

ही सजावट करण्यासाठी 150 स्वयंसेवकांनी काम केले आहे. एवढ्या पैशांनी मंदिरात सजावट केल्याने कोणतीही अनपेक्षित घटना होऊनये यासाठी मंदिरावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांसह मंदिरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. मंदिर प्रशासन यातून सर्व भाविकांवर लक्ष ठेवून आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. भाविक नोटांचे डेकोरेशन पाहून अवाक झालेत. अनेक जण लांबून लांबून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या