मुंबई | Mumbai
वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात आज सायंकाळपासून 30 नोव्हेंबरपर्यंत विठुरायाचे २४ तास दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपूरमध्ये दाखल होत असतात.
विठुरायाचे दर्शन मिळावे, यासाठी तासंतास वारकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागते. याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
यंदा कार्तिकी एकादशी ही २३ नोव्हेंबरला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तयारीचा आढावा घेतला. विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा ६५ एकर भक्ती सागर याची त्यांनी पाहणी केली. दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जीएसटी आयुक्तपदी आशीष शर्मा