Friday, November 22, 2024
Homeक्राईमकसारे शिवारात तब्बल पाच टन गोमांस पकडले

कसारे शिवारात तब्बल पाच टन गोमांस पकडले

साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त || संगमनेर तालुका पोलिसांची कारवाई

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील कसारे (Kasare) गावच्या शिवारातील जांभुळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर तब्बल पाच टन गोमांसाची (Beef) वाहतूक करणारा ट्रक संगमनेर तालुका पोलिसांनी (Sangamner Police) पकडला. सदर कारवाई सोमवारी (दि. 27 मे) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास करुन 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

- Advertisement -

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की जाकीरखान नसीरखान पठाण (वय 49, रा. मोगलपुरा, संगमनेर) व अय्युब मेहबुब कुरेशी (वय 53, रा. कुरणरोड, इस्लामपुरा, संगमनेर) हे दोघे आयशर ट्रकमधून (क्र. एमएच.17, बीवाय.7824) गोमांस (Beef) घेऊन जात असल्याची माहिती गुप्त खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानुसार पोहेकॉ. राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बडधे यांच्या पथकाने सापळा लावून हा ट्रक (Truck) पकडला.

या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 50 हजार रुपयांचे पाच टन गोमांस आणि 5 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. याप्रकरणी पोहेकॉ. दत्तात्रय बडधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांवर तालुका पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डी. जी. दिघे हे करत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या