Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याKasba Peth By Election : भाजपला 'जोर का झटका' देणारे रवींद्र धंगेकर...

Kasba Peth By Election : भाजपला ‘जोर का झटका’ देणारे रवींद्र धंगेकर आहे तरी कोण? वाचा सविस्तर

पुणे | Pune

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी अकरा हजार चाळीस मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभव झाला आहे…

- Advertisement -

रवींद्र धंगेकर यांची कारकीर्द

धंगेकर हे काँग्रेसमध्ये येण्याआधी शिवसेनेत कार्यरत होते. त्यानंतर ते मनसेत गेले. मनसेतून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे आणि काँग्रेसकडून त्यांना कसबा पेठ पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली…

रवींद्र धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू होते. मनसेत त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केले. मनसेत त्यांचे राजकीय वजन वाढले. चारवेळा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पालिकेच्या माध्यमातून त्यांनी कसबा पेठ मतदारसंघात अनेक कामे केलीत.

रवींद्र धंगेकर यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढली होती. यावेळी त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालिन उमेदवार गिरीश बापट यांना मोठे आव्हान दिले होते. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. बापट यांनी नवख्या धंगेकरांवर केवळ 7 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर ते बापट यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख झाली.

2014 मध्येही कसबा पेठेतून धंगेकर यांनी निवडणूक लढवली. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. 2017 मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना काँग्रेसकडून 2019 मध्ये तिकीट मिळाले नाही. यावेळी अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

नांदेड लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या चाकातून अचानक धूर; प्रवाशांची तारांबळ

मागील 25 वर्षांपासून रवींद्र धंगेकर कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागांमध्ये रवींद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कसबा पोटनिवडणूक : १९९१ च्या विजयाची पुनरावृत्ती, नेमकं काय घडलं होतं तेव्हा? जाणून घ्या

त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळणार हे सुरुवातीपासूनच ठरले होते. पण मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या धंगेकरांनी रासनेंना एकदाही आघाडी घेण्याची संधी दिली नाही. अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी कसब्यात ऐतिहासिक विजय मिळवत भाजपचा पारंपारिक मतदारसंघ हिसकावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या