Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याकसबापेठ, चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 'इतके' टक्के मतदान

कसबापेठ, चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी ‘इतके’ टक्के मतदान

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही जागांच्या पोटनिवडणूकीसाठी आज मतदान झाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पुण्यातील अनेक नागरिकांचा सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्याकडे कल दिसला मात्र दुपारनंतर मतदान संथ गतीने सुरु होतं. सकाळी कसबा आणि चिंचवड मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यात ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात सहभाग होता. सकाळी मतदानासारखं महत्वाचं काम आटपूनच दिवसाची सुरुवात करायची, अशा भावना मतदारांनी व्यक्त केली होती.

कसबा पोटनिवडणुकीत एकूण १६ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

चिंचवडमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 41.06 टक्के मतदान, तर कसब्यात 5 वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान झाले. आत्ता २ मार्चला येणाऱ्या निवडणूक निकाला कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या