श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मध्ये अनियमित कारभार होत असल्याच्या तक्रारी येत असताना आता काष्टीत असणाऱ्या धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. काष्टी ता. श्रीगोंदा च्या सन 2013 ते 2018 च्या लेखापरीक्षणात आढळून आलेली अफरातफर रक्कम रु.५४,१८,०४६/- बाबत संस्थेचे चेअरमन ज्योती रमेश गवळी, त्यांचे पती .रमेश सर्जेराव गवळी व मॅनेजर भारत सदाशिव डोईफोडे यांचे विरोधात श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काष्टी येथील धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत काष्टी या संस्थेच्या चेअरमन ज्योती रमेश गवळी , त्यांचे पती श्री रमेश सर्जेराव गवळी व संस्थेचे मनेजर भारत सदाशिव डोईफोडे यांनी आपले पदाचा गैरवापर करुन संगनमताने ठेवीदार यांनी संस्थेकडे जमा ठेवलेल्या ठेवीच्या पैशातून ठेवीदार यांचा विश्वासघात करुन ५४ लाख १८हजारे ४६ रुपये इतक्या रक्कमेचा अपहार केला म्हणुन त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसात शासकीय लेखापरीक्षक सर्जेराव जामदार यांनी गुन्हा दाखल केला आहे. शासकीय लेखापरीक्षक असणारे जामदार यांना काष्टी येथिल धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मयादीत काष्टी या संस्थेचे दि .26 / 09 / 2013 ते 31/03/2018 या मुदतीचे लेखापरीक्षण करण्याबाबत आदेश देण्यात आला.
यापूर्वी च ही संस्था अवसायनात काढली असल्याने अवसायक एस. एम शेलुकर यांनी संस्थेचे दप्तर उपलब्ध करुन दिले.त्यानुसार संस्थेचे लेखापरीक्षण दि . 28/02/2020 रोजी पुर्ण केले आहे . धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लेखापरीक्षण अहवाल मध्ये मला संस्थेने ठराव करुन संस्थेच्या चेअरमन ज्योती रमेश गवळी यांचे पती श्री रमेश सर्जेराव गवळी रा.कौठा यांना हातावरील रोख शिल्लक बाळगण्याचे अधिकार दिले असल्याबाबतचा ठराव करण्यात आला होता.
अध्यक्ष ,सचिव आणि अध्यक्ष चे पती यांनी संस्थेच्या दप्तरामध्ये बनावट नोंदी घेवुन बनावट कागदपत्र तयार करुन ठेवीदारांचा विश्वासघात कसन रुपये 54,18,046 रुपयेची अफरातफर केलेली आहे. 65.000 रु.ठेवीची रक्कम किर्दीला उशिरा जमा करुन व्याजाचे नुकसान केले. 29594 रु . मुदत ठेवीची रक्कम किर्दीला उशिरा जमा घेवुन व्याजाचे नुकसान केले. 50,000 / – रु . ठेवीची रक्कम जमा दाखवली नाही.
22.75.000 / – रु विना कागदपत्र रोखीने कर्ज नावे टाकुन अपहार केला. 3,64,000 रु . ठेव पावत्यांची रक्कम जमा न घेता अपहार केला. 19.51.000 रुपये संस्थेच्या चलनाने रक्कम भरणा केलेली असताना ती जमा न घेता अपहार केला. 1.39.100 रुपये विना व्हाऊचर विना बील रक्कम रोखीने नावे टाकुन अपहार केला.
2.55.605 रुपये-हाऊचरवर सहया नसताना रक्कम किर्दीला कमी जमा घेवुन अपहार केला . 2,517 रुपये कर्जदाराची भरणा केलेली रक्कम किर्दीस कमी जमा घेऊन केलेला अपहार केला. 1.08.520 रुपये दैनिक ठेव सेव्हींग ठेव ठेवीदारांचे खात्यात रक्कम जमा नसताना जादा रक्कम अदा केली. 1,85.710 रुपये . जाणुन बुजुन संशयास्पद खर्च किर्दीस रोखीने नावे टाकले. असे ५४ लाख १८ हजार ,४६ रुपयांचा अपहार करण्यात आला .