काव्यसुगंध : किरण वैरागकर यांच्या पाऊस कविता
ढग का बरसतात?
पावसावरच्या कविता,
मलाही आवडतात
कोसळणार्या पावसात,
मोकळेपणानं रडू देतात
ढग का बरसतात?
ते काही कळत नाही
ओघळणारे अश्रू मात्र,
कोणाला दिसत नाहीत.
ढगांचं बरसणं संपलं,
की परत उजाडतं
डोळ्यांतल्या पाण्यालाही,
झरणं थांबवावं लागतं.
वीज आणि छप्पर
वीज पडताना आकाशातून,
नेहमीच छान दिसते
ज्यावर पडते त्याचं
डोईवरचं छप्परच मोडते.
पावसात भिजायला आवडणारे,
नाही राहत ओल आलेल्या घरात
बाहेर कोसळणार्या सरी,
टपकणार्या पाण्याकरता परात.
पावसात निजणं
गॅलरीत उभं राहून,
सारेच पावसात भिजतात
स्वत:ची भिजायची वेळ
आली की रेनकोट घालतात.
पावसाचं बरं असतं…
पावसाचं एक बरं असतं,
कोसळून जायचं असतं
नवीन नवीन ढगांना,
रितं करायचं असतं
झाकोळलेल्या आकाशात,
सूर्य पण लपतो
कोसळून गेलेल्या सरीमागे,
अवचित इंद्रधनुष्य चितारतो.
वीज आणि छप्पर
वीज पडताना आकाशातून,
नेहमीच छान दिसते
ज्यावर पडते त्याचं
डोईवरचं छप्परच मोडते.
पावसात भिजायला आवडणारे,
नाही राहत ओल आलेल्या घरात
बाहेर कोसळणार्या सरी,
टपकणार्या पाण्याकरता परात.
– किरण वैरागकर