Saturday, October 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला 'कायाकल्प पुरस्कार' जाहीर

मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘कायाकल्प पुरस्कार’ जाहीर

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

आरोग्य म्हंटले स्वच्छता व टापटीपपणा हा भाग महत्त्वाचा असतो. शासकीय दवाखान्यात अस्वच्छतेचेच साम्राज्य असते. जनसामान्यांच्या मनातील या भावनेचा अस्त होत चाललला आहे. कारण शासकीय रूग्णालये अथवा आरोग्य केंद्र सुद्धा स्वच्छ व सुंदर असतात. याच सुंदर व मुर्तीमंत उदाहरण म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहाडी. या आरोग्य केंद्रास प्रतिष्ठेचा समजला जाणारा कायाकल्प हा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तसेच मोहाडी अंतर्गत कोर्‍हाटे उपकेंद्रास जिल्ह्यातून उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पेश चोपडे यांनी दिली.

शासकीय रुग्णालयात सर्व सामान्यांना चांगल्या सेवा मिळाले पाहिजे आणि सेवाही चांगल्या मिळतातच परंतु अस्वच्छतेचे साम्राज्य बघावयास मिळत होते. त्यामुळे जनतेचा शासकीय रूग्णालयांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य खात्याच्या वतीने देशभर रूग्णालय स्वच्छतेसाठी कायाकल्प हा पुरस्कार 2015 पासुन दिला जात आहे. हा पुरस्कार देताना जिल्हा स्तरीय अधिका-यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

यात आरोग्य केंद्रामधील स्वच्छतेविषयी विविध निकष जाहीर केले होते. अंतर्गत रुग्ण तपासणी, रूग्णांच्या मुलाखती, रुग्णालय बाह्य स्वच्छत: , जैविक कचरा विल्हेवाट, कर्मचारी मुलाखतींसह मुल्यांकन अशा विविध स्तरावर पाहाणी करण्यात आली. या सर्व निकषांची पुर्तता करत मोहाडी आरोग्य केंद्राने जिल्ह्यातील सर्व स्पर्धक 112 आरोग्य केंद्रातुन प्रथम क्रमांक पटकावला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगेे यांच्या सहकार्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कुशारे, डॉ. सचिन बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे केलेल्या परिश्रमाचे सार्थक होवून मोहाडी आरोग्य केंद्र जिल्ह्यात आदर्श ठरले असुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला असल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या