Thursday, January 8, 2026
Homeदेश विदेशकेदारनाथ मार्गावर भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

केदारनाथ मार्गावर भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथमध्ये भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. केदारनाथ राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाले असून या भूस्खलनात आतापर्यंत पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती निवारण दलाने (एसडीआरएफ) मंगळवारी सकाळी गौरीकुंड आणि सोनप्रयाग दरम्यानच्या केदारनाथ मार्गावर झालेल्या भूस्खलनाच्या ढिगाऱ्यातून आणखी ४ भाविकांचे मृतदेह बाहेर काढले. यामुळे मृतांची संख्या ५ झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनप्रयाग आणि गौरीकुंड दरम्यान मुनकटियाजवळ सोमवारी संध्याकाळी उशिरा भूस्खलनाची घटना घडली. भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली लोक दबले गेले होते. सोमवारी भूस्खलन झाल्यानंतर खराब हवामान, बर्फवृष्टी आणि घटनास्थळी सतत दगड, मातीचे ढिगारे पडत असल्याने बचावकार्य थांबवण्यात आले होते. यादरम्यान सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृतदेह सापडला तर मंगळवारी सकाळी आणखी ४ भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून तीन भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

भाविक केदारनाथ धाम येथे दर्शन करुन निघाले होते. त्यावेळी सोमवारी सांयकाळी भूस्खलन झाले. भूस्खलनाची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती आणि राष्ट्रीय आपत्ती दलाचे पथक दाखल झाले. त्यानंतर तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले.

YouTube video player

मृतामंध्ये मध्य प्रदेशातील घाट जिल्ह्यातील ५० वर्षीय दुर्गाबाई खापर, नेपाळमधील धनवा जिल्ह्यातील वैदेही येथील ७० वर्षीय तितली देवी; मध्य प्रदेशातील धार येथील ५० वर्षीय समनबाई आणि गुजरातमधील सुरत येथील ५२ वर्षीय भरत भाई निरालाल यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, दरड कोसळल्यानंतर बंद झालेला रस्ता काही वेळाने प्रवाशांना चालण्यासाठी खुला करण्यात आला आहे. गौरीकुंडच्या दिशेने थांबलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे सोनप्रयागच्या दिशेने पाठवले गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...