Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशKedarnath Viral Video: एअरलिफ्ट केलेल्या हेलिकॉप्टरची चेन हवेतच तुटली, शेकडो फुटावरुन झाले...

Kedarnath Viral Video: एअरलिफ्ट केलेल्या हेलिकॉप्टरची चेन हवेतच तुटली, शेकडो फुटावरुन झाले क्रॅश

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तराखंडच्या केदारनाथ धाम येथून ही बातमी येत आहे. शनिवारी सकाळी केदारनाथ येथे एका प्रवासी हेलिकॉप्टरचा अपघाताचा थरकाप उडवणारा अपघात झाल्याची घटना घडली आहे. भारतीय वायुसेनेचं एमआय – १७ हे हेलिकॉप्टर एका खराब झालेल्या हेलिकॉप्टर घेऊन जात होते. त्यावेळी एयरलिफ्ट केलेल्या हेलिकॉप्टरची टोकन चेक तुटल्याने हेलिकॉप्टर खाली कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Kestrel Aviation चे हे हेलिकॉप्टर MI-17 विमानानं दुरुस्तीसाठी नेले जात होते. २४ मे २०२४ रोजी लँडिंगवेळी तांत्रिक बिघाडामुळे ज्या हेलिकॉप्टरची तात्काळ लँडिंग करण्यात आली होती, तेच हेलिकॉप्टर शनिवारी सकाळी क्रॅश झाले. तात्काळ लँडिंग करण्यात आलेलं, खराब झालेले हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी भारतीय वायुसेनेच्या एमआय – १७ या हेलिकॉप्टरच्या मदतीने गोचर धावपट्टी इथे एयरलिफ्ट करुन घेऊन निघाले होते. मात्र त्यावेळी एमआय – १७ ह्या हेलिकॉप्टरचे संतूलन बिघडले. हेलिकॉप्टरचा संतूलन बिघडल्याने पायलटने या परिस्थितीत एक रिकामी जागा पाहून केदारनाथ खोऱ्यात ते हेलिकॉप्टर ड्रॉप केले.

- Advertisement -

या घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा प्रवासी होते, मात्र त्यावेळीही कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. मात्र, आज हे हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी नेत असताना अपघातग्रस्त झाले. हे एक खाजगी हेलिकॉप्टर होते आणि पूर्वी केदारनाथ मंदिरात प्रवाशांना नेण्यासाठी वापरले जात होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या