Friday, October 23, 2026
Homeक्राईमAhilyanagar : केडगावात संशयित भेसळीचे दूध पॅकेट नष्ट

Ahilyanagar : केडगावात संशयित भेसळीचे दूध पॅकेट नष्ट

झकास वडापाव सेंटरचे उत्पादन केंद्र परवान्याअभावी बंद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेअंतर्गत केडगाव परिसरातील शितल मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्स आणि झकास वडापाव सेंटरवर कारवाई करण्यात आली. शितल मिल्कमधील भेसळीचा संशय असलेले 556 दूध पॅकेट जप्त करून नष्ट करण्यात आले, तर आवश्यक परवाना नसल्याने झकास वडापाव सेंटरचे उत्पादन केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभर अन्नपदार्थांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार बुधवारी (8 जुलै) सहायक आयुक्त गौरव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे आणि साजिदा मुल्ला यांनी केडगाव येथील शितल मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्स येथे तपासणी केली. या ठिकाणी दूध संकलन करून त्याचे पिशव्यांमध्ये पॅकिंग करून विक्री केली जात असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान अधिकार्‍यांना दूधाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने 15 हजार 568 रूपये किमतीच्या 556 दूधाच्या बॅग जप्त करण्यात आल्या. संबंधित दूधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला, अशी माहिती सहायक आयुक्त गौरव जगताप यांनी दिली.

दरम्यान, गुरूवारी केडगाव येथील झकास वडापाव सेंटरच्या उत्पादन केंद्राचीही तपासणी करण्यात आली. वडापाव तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार केला जात असलेल्या ठिकाणी आवश्यक अन्न परवाना नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित उत्पादन केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे जगताप यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील...