Sunday, July 26, 2026
Homeक्राईमCrime News : केडगावमध्ये सामाईक रस्त्याच्या वादातून हाणामारी

Crime News : केडगावमध्ये सामाईक रस्त्याच्या वादातून हाणामारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केडगाव येथील कोतकर मळा परिसरात सामाईक रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी चौघांविरूध्द बुधवारी (24 जून) गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहे.

- Advertisement -

याबाबत जखमी सहादू किमन कोतकर (वय 60, रा. कोतकर मळा, केडगाव) यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कोतकर, ऋतुजा ज्ञानेश्वर कोतकर, सुमन ऊर्फ बबई यादव कोतकर, ऋषीकेश यादव कोतकर (सर्व रा. कोतकर मळा, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 21 जून 2026 रोजी रात्री 10.20 वाजण्याच्या सुमारास कोतकर मळा येथील सामाईक रस्त्यावर हा प्रकार घडला. सहादू कोतकर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी चाकूसारखे दिसणारे शस्त्र, दगड आणि लाकडी दांडक्यांचा वापर करून सहादू कोतकर, त्यांची पत्नी नंदा कोतकर आणि मुलगा सागर कोतकर यांना मारहाण केली.

तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दाताने चावा घेत दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी शिवीगाळ करत तुम्ही येथे कसे राहता तेच पाहतो, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या गोंधळात नंदा कोतकर यांच्या गळ्यातील सुमारे 7.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस अंमलदार विश्वास गाजरे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध –...

0
नाशिक | Nashik श्रीक्षेत्र कपिलधारा-कावनई (Shri Kshetra Kapildhara Kavnai) हे सिंहस्थ कुंभमेळ्याशी ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या निगडित असलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या...