Wednesday, February 4, 2026
HomeनगरCrime News : महावितरणच्या अधिकार्‍यांवर हल्ला करणारे गजाआड

Crime News : महावितरणच्या अधिकार्‍यांवर हल्ला करणारे गजाआड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर हल्ला करून त्यांच्याकडील दोन हजार रूपये बळजबरीने काढून घेणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. सागर बाप्पुसाहेब म्हस्के व शेहबाज निसार सय्यद (दोघे रा. पाटील कॉलनी, म्हसोबा चौक, केडगाव) अशी त्यांची नावे आहेत.

- Advertisement -

30 मे रोजी महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल शीतराम शीलावंत (वय 35, रा. शाहूनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी सांगितले की, पहाटे 03:15 वाजता रंगोली चौक, केडगाव येथे लाईटचा फॉल्ट तपासण्याचे काम करत असताना दोन इसमांनी येऊन शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यांनी सरकारी कामात अडथळा आणत खिशातील दोन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले.

YouTube video player

पोलिसांनी गुन्हा दाखल केला व गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की संशयित आरोपी पळून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कांदा मार्केट रस्ता, केडगाव येथे सापळा रचला व तात्काळ कारवाई करत सागर बाप्पूसाहेब म्हस्के व शेहबाज निसार सय्यद यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती, निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सपकाळे, अंमलदार पितळे, दळवी, दरंदले, दीपक रोहकले, तानाजी पवार, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सुरज कदम, राम हंडाळ, सचिन लोळगे, महेश पवार व महिला अंमलदार नांगरे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...