Friday, November 22, 2024
Homeक्राईमकेडगाव, सावेडीत दिवसा तीन घरे फोडली

केडगाव, सावेडीत दिवसा तीन घरे फोडली

सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ऐन सणासुदीच्या काळात चोरट्यांकडून दिवसा घरफोडी करून दागिने, रोकड लंपास केली जात आहे. शनिवारी (19 ऑक्टोबर) तोफखाना हद्दीत एक तर कोतवाली हद्दीत दोन ठिकाणी घरातील दागिने, रोकड लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. शुभांगी श्रीपाद दगडे (वय 31) यांचे बोरूडे मळा, आराधना कॉलनीतील घरातून 15 हजारांची रोकड, सोन्याचे व चांदीचे दागिने असा 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरी झाली त्यावेळी शुभांगी यांचे घर उघडे होते व त्यांच्या सासू एकट्याच घरात होत्या. चोरट्यांनी उघड्या घरातून आत प्रवेश केला व बेडरूममधून ऐवज चोरून नेला. सदरचा प्रकार शुभांगी यांच्या सासूच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शुभांगीला सदरचा प्रकार सांगितला. त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शुभांगीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

केडगाव उपनगरातील आदर्श हाईट्स, दूधसागर सोसायटी येथील दोन घरे चोरट्यांनी शनिवारी सकाळी सव्वा दहा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान फोडली. एका घरातून 17.5 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व एक हजाराची रोकड तर दुसर्‍या घरातून तीन हजारांची रोकड असा एकूण 56 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी मनीषा अशोक वामन (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा यांच्यासह मनोरमा विनय काकडे यांचे घर शनिवारी सकाळी कुलूप लावून बंद केले होते. त्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक केली व रोकड, दागिने चोरून नेले. सदरची घटना दुपारी साडेबारा वाजता लक्षात आली. कोतवाली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या