Sunday, May 26, 2024
Homeनगरकेडगावातील बिंगोवर पोलिसांचा छापा

केडगावातील बिंगोवर पोलिसांचा छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव उपनगरातील अंबिका बस स्टॉप जवळ मोबाईलवर फन टार्गेट बिंगो जुगाराचा खेळ सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ संतोष होगळे (वय 25 रा. दूध सागर सोसायटी, केडगाव) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल असा 12 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 14) दुपारी तीन वाजता एलसीबी पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र घुंगासे, संतोष लोढे कोतवाली पोलीस ठाण्यातील अवैध धंद्यावर कारवाईकामी गस्त घालत असताना गुरूदत्त हॉटेल, आंबिका बस स्टॉप जवळ, केडगाव येथे दशरथ संतोष होगळे हा लोकांकडून पैसे लावून मोबाईलवर फन टार्गेट बिंगो नावाचा हार जितीचा जुगार खेळवित व खेळत आहे, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल जप्त केला असून होगळे याला ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या