Wednesday, March 26, 2025
Homeनगरजातीवाचक शिवीगाळ करत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार

जातीवाचक शिवीगाळ करत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार

केडगाव परिसारातील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तू आमच्या भांडणात पडू नको, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आल्याचे घटना केडगाव परिसरात शुक्रवार दि. 30 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. अभिषेक बाळासाहेब नवगिरे (वय 23 रा.बुरुडगाव, ता.नगर, हल्ली रा. ऑगस्ट कॉलनी, केडगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. नवगिरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जहीर ईक्रम सय्यद, लैला जहीर सय्यद व एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी नवगिरे हे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता त्यांचे काम आटोपून घरी जाण्यासाठी मोटरसायकल चालू करत असताना आरोपी जहीर सय्यद व लैला सय्यद तेथे आले. त्यावेळी जहीर सय्यद याच्या हातात कोयता होता. तो नवगिरे यांना म्हणाला, तू आमच्या भांडणात पडू नको, तुला काय करायचे मी कोठेही बल्ल्या ठोकीन, थांब तुला मी आता जिवे मारीन, तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून त्याने हातातील कोयत्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. कोयत्याचा वार नवगिरे यांच्या डोक्याला लागल्याने डोक्याला जखम झाली. त्यानंतर लैला सय्यद आणि अनोळखी इसम यांनी फिर्यादी नवगिरे यांच्या पोटात लाथा मारून त्यांचा हात पिरगळला.

जातिवाचक शिवीगाळ करून येथे काम कसा करतो, या धेंडाचे हातपाय तोडतो अशी धमकी दिली. तेव्हा फिर्यादी नवगिरे यांनी आरडाओरड केल्याने अकबर सय्यद व सतीश सातपुते हे फिर्यादी नवगिरे यांना वाचविण्यासाठी आले असता, आरोपींनी तेथून पलायन केले असे फिर्यादीत म्हटले आहे. शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे उपनिरीक्षक सेदवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास उपअधीक्षक भारती करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

एसटी महामंडळाच्या बसेस पर्यावरणपूरक इंधनावर परावर्तीत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai एसटी महामंडळाच्या सर्व बसेस पर्यावरणपूरक इंधनावर परावर्तीत करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक आणि एलएनजी...