Saturday, May 4, 2024
Homeनगरकेडगावात तीन हातभट्टीवर छापेमारी

केडगावात तीन हातभट्टीवर छापेमारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने कोतवाली पोलिसांच्या (Kotwali Police) मदतीने लिंक रोड परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर (Gavthi Alcohol) कारवाई केली. दहा हजार रूपयांचे गावठी हातभट्टीची दारू (Gavthi Alcohol) तयार करण्यासाठी लागणारे रसायन, तीन हजार 500 रूपयांची गावठी हातभट्टीची तयार दारू असा 13 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.

- Advertisement -

पोलीस अंमलदार संदीप पवार यांनी फिर्यादी दिली. गोकुळ भास्कर पवार (वय 42, रा. लिंकरोड, पवार मळा, अहमदनगर) याच्याविरूद्ध मुंबई प्रोव्हिबिशन अ‍ॅक्ट कायदा 65, फ, क, ड, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे संदीप घोडके यांना पवार हा राहत्या घराच्या आडोश्याला गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे अंमलदार पवार, घोडके, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, संभाजी कोतकर, गणेश धोत्रे व सागर पालवे यांनी कारवाई केली.

कोतवाली पोलिसांच्या (Kotwali Police) पथकाने केडगाव (Kedgav) परिसरातील दोन गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई केली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत दोन हजार 200 रूपयांची तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट (Destroy Gavthi Alcohol) करण्यात आली.

पोलीस अंमलदार अंकुश आजिनाथ कासार (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. आनंद दत्तात्रय धस (वय 29 रा. सोनेवाडी चौक, गोपाळ वस्ती, केडगाव) आणि योगेश सुरेश मैड (वय 39, रा. नम्रता कॉलनी, भुषणनगर, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनेवाडी चौकात पत्र्याच्या शेडमध्ये आणि नेप्ती रोडवरील (Nepati Road) सार्वजनिक शौचायलाच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या