Wednesday, March 26, 2025
Homeनगरकेडगावचे सराईत चोरटे गजाआड

केडगावचे सराईत चोरटे गजाआड

एलसीबीची कारवाई । सावेडीतून चोरलेली कारही जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडीच्या बोरुडे मळ्यातून कार चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले दोघे सराईत चोर निघाले. केडगावच्या दोघा चोरांना अटक करण्यात एलसीबी पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी या चोरट्यांकडून चोरी केलेली कारही जप्त केली आहे.

- Advertisement -

गणेश शिवाजी लोखंडे (रा. लोंढे मळा, केडगाव) आणि संकेत सुनील खापरे (रा. विनायकनगर) अशी अटक केेलेल्या दोघांची नावे आहेत. 25 नोव्हेंबरला बोरुडे मळ्यातून या दोघांनी स्वीफ्ट कार चोरी केली होती. चोरी केलेली कार घेऊन हे दोघे सुपा एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पोलीस पथकाने सुपा एमआयडीसी परिसरात सापळा लावला. कार दिसताच पोलिस पथकाने घेराव घालत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी ही कार बोरुडे मळ्यातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कार जप्त केली.

औरंगाबाद येथील विजय प्रभाकर लटंगे यांची स्वीफ्ट कार (एम.एच.20,एजी-6758) या दोघांनी चोरी केली होती. त्यासदंर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातच करायचे चोर्‍या
गणेश लोखंडे विरोधात सहा तर संकेत खापरे विरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. हे दोघे शहरातच चोरी करत असल्याचे चौकशीत समोर आले. कोतवाली आणि तोफखाना या दोनच पोलीस ठाण्यात दोघांविरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. चोरीच्या आणखी काही गुन्ह्याची उकल या दोघांकडून होईल असे पोलिसांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Eknath Shinde: शिवसैनिकांना कचरा समजणारे हाय व्होल्टेज शॉकमधून सावरले नाहीत; एकनाथ...

0
मुंबई | Mumbaiएकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलेच नाही, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती....